Header Image

एक वही एक पेन उपक्रम

एक वही एक पेन उपक्रम

एक वही एक पेन उपक्रम
प्रयास युवा मंच तर्फे गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील प्रयास युवा मंच घेऊन येत आहे “एक वही एक पेन” उपक्रम. उपक्रमाचे स्वरूप असे कि सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये गणपतीला भाविकांनी एक वही किंवा एक पेन अर्पण करून प्रार्थना करावी. ती वही आणि पेन प्रयास युवा मंच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला मदत करेल. चला तर मग, विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला वही आणि पेन अर्पण करूयात आणि ती वही आणि पेन बाप्पाचा प्रसाद म्हणून गरजू विद्यार्थ्यांना देऊयात. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी फक्त एवढेच करायचे आहे की, उत्सवानंतर प्रयास युवा मंच ला खाली दिलेल्या माध्यमांवर संपर्क साधावा आणि तुम्ही जमा केलेले वही व पेन जमा करावेत. संपर्क : पराग: ७८७५७३९७०२, नेहा: ८२७५६५५६०३

Recent Events